साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये प्रयोग करून विज्ञान दिन साजरा..

0
New-Doc-02-28-2026-23.28.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
      या प्रसंगी व्यासपिठावर ज्येष्ठ शिक्षक दिलीप पाटील हे अध्यक्षस्थानी होते. सौ.वैद्य, मुकेश पाटील, विज्ञान शिक्षक डी.आर.महाजन उपस्थित होते. दिप प्रज्वलन वैज्ञानिक पद्धतीने, म्हणजेच पोटॅशियम परमॅंगनेट व ग्लिसरीनच्या मिश्रणाने

करण्यात आला. सी.व्हि .रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात दिपक महाजन यांनी सी.व्ही.रामण यांच्या कार्याचा व संशोधनाचा परिचय करुन देत आपण विज्ञानाची कास धरा हे सांगितले. ऋतुजा बावा, 8 ब, पुजा पाटील 9 अ, अपुर्वा पाटील 9 ब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुकेश पाटील व सौ.वैद्य मॅडम यांनी आपल्या भाषणात विज्ञान व त्या निमित्त मानव जातीची झालेली प्रगती ह्या विषयी आपले मनोगत व्यक्त करून वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थिनींमध्ये निर्माण केला. अध्यक्षिय भाषणात दिलीप पाटील सर यांनी प्रत्येक विषयात विज्ञानाची कशी सांगड आहे हे उदाहरणा द्वारे विद्यार्थिनिंना समजून सांगितले. श्रावणी पाटील या विद्यार्थिनीने पेटता कापूर हातावर धरून तोंडात टाकून प्रयोग करून दाखवला. आपण अंधश्रद्धे पासून दूर राहा असे सांगितले. सूत्रसंचलन साक्षी मनोहर पाटील व लावण्या शिसोदे यांनी तर आभार लावण्या शिसोदे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed