जितू भाऊ ठाकूर यांची तज्ञ संचालकपदी बिनविरोध निवड..

0
New-Doc-02-27-2026-22.55.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी, अमळनेर येथे पत्रकार जितू भाऊ ठाकूर यांची तज्ञ संचालक पदावर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


अभ्यासू, अभ्यासक आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून जितू भाऊ ठाकूर यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे पतपेढीच्या संचालक मंडळात नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यात सकारात्मक ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासू दृष्टिकोनाचा पतपेढीच्या भविष्यातील कामकाजात निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास सभासद व हितचिंतकांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed