अमळनेरची चिमुकली ठरली प्रेरणास्थान ; ५ वर्षीय हानिया काझीचा पहिलाच रोजा पूर्ण..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : प्रताप नगर, गळवाडे रोड परिसरातील अवघ्या पाच वर्षांच्या हानिया काझी राजोद्दीन हिने पवित्र रमजान महिन्यात आपला पहिलाच रोजा

पूर्ण करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. इतक्या लहान वयात दाखवलेली तिची श्रद्धा, जिद्द आणि संयम पाहून परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हानियाने आनंदाने आणि उत्साहाने पूर्ण दिवसाचा रोजा पाळत धार्मिक संस्कारांची जाणीव दाखवून दिली. तिच्या या प्रयत्नामुळे कुटुंबीयांसह शेजारी, नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतक्या कोवळ्या वयात धार्मिक कर्तव्य समजून घेत तिने केलेला हा प्रयत्न इतर मुलांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिसरात तिचे अभिनंदन करण्यात येत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
