रुग्णवाहिका चालकाचे मानवतेचे दर्शनजखमी गर्भवती हरणीला दिले जीवदान..

0
New-Doc-02-24-2026-06.49.jpg

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : मानवतेचा हृदयस्पर्शी प्रत्यय देणारी घटना अमळनेर येथे समोर आली आहे. येथील खासगी रुग्णवाहिका चालक आकाश पाटील यांनी आपल्या तत्परतेने जखमी गर्भवती हरणीचे आणि तिच्या पोटातील पिलाचे प्राण वाचवले.


आकाश पाटील हे एका रुग्णाला धुळे येथे सोडून रुग्णवाहिकेसह परत अमळनेरकडे येत होते. रात्रीच्या सुमारास चोपडा कोंडावळ व डांगर दरम्यानच्या रस्त्यावर त्यांना एक हरीण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसले. अज्ञात वाहनाच्या धडकेत हे हरीण गंभीर जखमी झाले होते.
रस्त्याच्या कडेला विव्हळत पडलेल्या त्या मुक्या जीवाला पाहून आकाश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णवाहिका थांबवली. जवळ जाऊन पाहणी केली असता ती हरणी गर्भवती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने त्या हरणीला रुग्णवाहिकेत घेतले आणि थेट अमळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले.
दवाखान्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे हरणीचे तसेच तिच्या पोटातील पिलाचे प्राण वाचवण्यात यश आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी देसले यांनी आकाश पाटील यांची भेट घेत त्यांच्या संवेदनशीलतेचे व तत्परतेचे कौतुक केले.
मानवतेचा संदेश देणारी ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, एका रुग्णवाहिका चालकाने माणुसकीच्या पलीकडे जाऊन वन्यजीवाचे प्राण वाचविल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed