चाळीसगाव एच.यू.एच. मुंडिया पब्लिक स्कूलमध्ये ‘स्पोर्टिवो 2026’ वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

0
New-Doc-02-18-2026-14.37.jpg

चाळीसगाव /प्रतिनिधी
चाळीसगाव येथील एच.यू.एच. मुंडिया पब्लिक स्कूलमध्ये 16 व 17 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धा ‘स्पोर्टिवो 2026’ मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत 40 पेक्षा अधिक विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना तसेच नेतृत्व गुणांचा विकास होण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विजय मदनलाल शर्मा (स्वच्छता दूत, चाळीसगाव नगरपालिका), वैश्नवी विजय शर्मा (राष्ट्रीय कुस्तीपटू) आणि शबीर मुहम्मद (डायरेक्टर, YES इंडिया फाउंडेशन) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाचे कौतुक करण्यात आले.
स्पर्धेच्या एकूण गुणतालिकेत ब्लू हाऊसने प्रथम क्रमांक पटकावला, तर रेड हाऊसने उपविजेतेपद मिळवले.
प्राचार्य स्वाफवान यांच्या मार्गदर्शनाखाली नोमान सर, एजल सर, रक्षिता राणे मॅडम, गायत्री खैरनार मॅडम आणि नौशाद शहानवाज मॅडम यांच्या सहकार्याने हा क्रीडा सोहळा यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed