जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी अमळनेरचे स्वप्नील पाटील बिनविरोध…
अमळनेर /आबिद शेख
जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भुसावळ शहरातील हिंदी सेवा मंडळ संचलित आर. एन. नेता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे उपशिक्षक अमित विजय चौधरी यांची, तर उपाध्यक्षपदी अमळनेर येथील साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे स्वप्नील वसंतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जळगाव येथे शनिवारी पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. आर. पाटील यांनी कामकाज पाहिले. कोणताही विरोधी उमेदवार नसल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर नवनियुक्त अध्यक्ष अमित चौधरी व उपाध्यक्ष स्वप्नील पाटील यांचे संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रसन्ना बोरोले, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संतोष मराठे, प्रशांत साखरे, सुनील पवार, रूपाली पाटील, गणेश लोडते, प्रफुल्ल सरोदे, वना महाजन, राकेश पाटील, धनंजय काकडे, अविनाश घुगे, महेंद्र रामोसे, मोहन पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनियुक्त उपाध्यक्ष स्वप्नील पाटील हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 155000
22 Ct सोने 91.60% : ₹. 142600
18 Ct सोने 75.00% : ₹. 117800
शुद्ध चांदी 999%:₹. 2850/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
