पाडळसरे धरणाला लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे – संदीप घोरपडे खरी श्रद्धांजली ठरेल : सर्वपक्षीय सभेत भावना व्यक्त..

0
New-Doc-01-29-2026-23.41.jpg


अमळनेर /आबिद शेख
पातोंडा येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय सभेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रथम स्व. अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना स्व. अजितदादा पवार यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. अजितदादांची जडणघडण जाणते राजा शरदचंद्रजी पवार यांच्या सहवासात झाली. लोकसंग्रह, कामाची हातोटी आणि निर्णयक्षमता हा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला. मात्र समाजकारण व राजकारणात पूर्णतः झोकून दिल्याने कला, साहित्य, काव्य, शास्त्र व विनोद यांकडे फारसे लक्ष देता आले नाही; त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मुत्सद्देगिरी अधिक ठळकपणे पुढे येऊ शकली नाही आणि मुख्यमंत्रीपद त्यांना गमवावे लागले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
अमळनेर येथील नाट्यगृहाच्या निर्मिती काळात तत्कालीन नगरविकास मंत्री राजेश टोपे यांना आदेश देऊन, एका सामान्य कार्यकर्त्याचा आग्रह मान्य करत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून भरीव निधी उपलब्ध करून देत नाट्यगृह पूर्णत्वास नेण्याची काळजी अजितदादांनी घेतली, याची आठवणही घोरपडे यांनी करून दिली. “वेळेला, शब्दाला आणि कार्याला जागणारे असे नेतृत्व महाराष्ट्रात दुर्मीळ होते; अशी भरपाई कोणीही करू शकणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी संदीप घोरपडे यांनी पातोंडा ग्रामस्थांना ग्रामसभेत ठराव करून पाडळसरे धरणाला ‘अजित डॅम’ असे नाव देण्याचे आवाहन केले. तसेच पाडळसरे गावासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातून ठराव करून पाडळसरे धरणाला माननीय नामदार अजित रावजी पवार यांचे नाव देण्याचा आग्रह धरावा; हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त केली. या प्रस्तावाला उपस्थितांनी भरीव समर्थन दिले.
यावेळी दादासो, संदीप घोरपडे, दादासो भागवत पाटील, रघुनाथ दादा संदानशिव, महेंद्र अण्णा बोरसे, समाधान भाऊ धनगर, वसुंधराताई लांडगे, प्रणव चौधरी, अमित पवार सर, महेंद्र पाटील सर (पातोंडा), भटूदादा बाविस्कर, प्रविण लाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमास पातोंडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 185000

22 Ct सोने 91.60% : ₹. 170200

18 Ct सोने 75.00% : ₹. 140600

शुद्ध चांदी 999%:₹. 4020/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed