आमदार अनिल पाटलांच्या निवासस्थानी शोककळा.                                              कार्यकर्त्यांना अश्रू अनावर,अनेक जण बारामतीकडे रवाना..

0
New-Doc-01-28-2026-23.09.jpg

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर:-महाराष्ट्राचे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अमळनेर येथे समजताच शेकडो हितचिंतक व कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेऊन शोक व्यक्त केला.
आमदार अनिल पाटील हे मुंबईत असल्याने कार्यकर्त्यानी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांची भेट घेतली,त्या प्रचंड हादरल्या असताना त्यांच्यासह कार्यकर्त्यांना देखील अश्रू अनावर झाले होते.या घटनेने संपूर्ण राष्ट्रवादी कुटुंबिवरच भला मोठा आघात असल्याने या दुःखातून आम्ही सावराव तरी कस असे भाव त्यांनी व्यक्त केले.दिवसभर अनिल पाटील यांच्या निवासस्थानी हितचिंतकांची वर्दळ सुरू होती!अनेकांनी आमदार अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते आघात झाल्याने ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.सायंकाळी असंख्य कार्यकर्ते दादांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीकडे रवाना झाले.

अमळनेरात अंत्ययात्रेचे आज लाईव्ह प्रक्षेपण

अजितदादा पवार यांची अंत्ययात्रा आज दिनांक 29 रोजी सकाळी 9 वाजता बारामती येथे काढण्यात येणार असून याचे लाईव्ह प्रक्षेपण आज आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या डिजिटल स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे.यावेळी दादांना सामूहिक श्रद्धांजली देखील अर्पण केली जाणार असल्याने महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक आणि दादा प्रेमींनी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed