जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक ३ मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

0
New-Doc-01-27-2026-07.36.jpg

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद उर्दू शाळा क्रमांक ३ येथे भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समितीचे अध्यक्ष इक्बाल दगु शाह होते.
यावेळी शिक्षण समितीचे सदस्य तज्ञ करीम खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण शाळा परिसरात देशप्रेम व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट,व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह स्पष्टपणे दिसून आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना देशभक्ती, एकता तसेच भारतीय संविधानातील मूल्ये आत्मसात करण्याचा संदेश दिला.
हा कार्यक्रम शांततापूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed