प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व विविध स्पर्धांचा उत्साहपूर्ण सोहळा..

0
New-Doc-01-20-2026-07.26.jpg


अमळनेर | आबिद शेख
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शुक्रवार, दिनांक १६ रोजी पाककला स्पर्धा तसेच रेट्रो फॅशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून समाजसेविका सौ. कृपाली अमित पाटील मॅडम यांची उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे समाजातील ज्येष्ठ महिलांनीही अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. पाककलेतील विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण पदार्थ तसेच रेट्रो फॅशनमधील आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला. यावेळी महिलांसाठी विविध प्रकारचे गंमतीदार खेळ आयोजित करण्यात आले होते. या खेळांमध्ये तरुणींसह ज्येष्ठ महिलांनीही उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले.
स्पर्धा व खेळांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक पटकावणाऱ्या महिलांना महिला मंडळातर्फे आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच समाजातील विधवा महिलांनाही या कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा सन्मान करण्यात आला, ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभू विश्वकर्मा सुतार समाज महिला मंडळाच्या प्रमुख व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये सौ. जान्हवी बोरसे, सौ. भारती जगताप, सौ. शीतल खैरनार, सौ. साधना ताई शार्दूल, सौ. अनिता खैरनार, सौ. सुरेखा मोरे, सौ. मनीषा मिस्तरी, सौ. जयश्री देवरे व सौ. धनश्री खैरनार यांनी हळदी-कुंकू कार्यक्रम व स्पर्धांचे प्रभावी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये सामाजिक एकोपा वृद्धिंगत होऊन आनंद व सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed