अमळनेरचा कुस्तीतील उगवता तारा : निजाम अलीची महाराष्ट्र केसरी साठी राज्य पातळीवर निवड..

अमळनेर /आबिद शेख
अमळनेर तालुक्याचा नावलौकिक वाढवणारी अभिमानास्पद कामगिरी कुस्ती क्षेत्रात पाहायला मिळाली आहे. येथील नामवंत कुस्तीपटू हाजी शब्बीर पहलवान यांचे पुतणे व हसन पहलवान यांचे सुपुत्र निजाम अली यांनी कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे.
भडगाव तालुक्यातील पेंडगाव येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अंतर्गत आयोजित जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत निजाम अली यांनी ९२ किलो वजन गटात उत्कृष्ट व दमदार खेळाचे प्रदर्शन करत यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्य पातळीवर निवड झाली आहे.
निजाम अली यांच्या या यशामुळे अमळनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून कुस्तीप्रेमी, खेळाडू, मार्गदर्शक व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाने अमळनेरचे नाव राज्यस्तरावर उज्वल झाले आहे.
निजाम अली यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन व महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
