लायन्स क्लब अमळनेरचा मकरसंक्रांती निमित्त “हंगर विक” अंतर्गत अन्नदान उपक्रम..

0
New-Doc-01-12-2026-21.29.jpg


अमळनेर /आबिद शेख
समाजातील गरजू घटकांपर्यंत सकस अन्न पोहोचावे व कोणताही नागरिक उपाशी राहू नये, या सेवाभावी उद्देशाने लायन्स क्लब अमळनेर तर्फे मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नर्मदावाडी येथे अन्नदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम लायन्स क्लबच्या “हंगर विक प्रोजेक्ट” अंतर्गत राबविण्यात आला असून, यापुढे महिन्यातील दर सोमवारी नियमित अन्नदान करण्यात येणार आहे.
मकरसंक्रांतीच्या शुभदिनी गरजू कुटुंबांना गोड पुरणपोळी, आमटी-भात, गोडशिरा, कुरडाई, पापड आदी पारंपरिक व पौष्टिक जेवणाचे वाटप करण्यात आले. सकाळी ११.४५ वाजता नर्मदावाडी परिसरात उपक्रमास सुरुवात झाली. अन्नवाटपासाठी लायन्स क्लबच्या स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी केली होती.
या वेळी काठेयावाडी जैन संघाचे अध्यक्ष नितीनकुमार शहा, गिरीष शहा, राजू देसाई, लायन्स डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, चेतन जैन, प्रशांत सिंघवी, डॉ. मिलिंद नवसारीकर, एस. डी. भरुचा, सुनील चौधरी, दिलीप गांधी, चंद्रकांत महाजन आदी मान्यवर व लायन्स क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. अन्नदानाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देणे हीच खरी संक्रांत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
लायन्स क्लब अमळनेरच्या या सेवाभावी उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. “हंगर विक” अंतर्गत पुढील काळातही गरजूंकरिता विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे क्लबकडून सांगण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत अन्न, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा पोहोचविणे हा लायन्स क्लबचा व्यापक उद्देश असल्याचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed