नॅशनल हायस्कूल, चाळीसगावचा ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत घवघवीत निकाल..

0
New-Doc-01-12-2026-20.59.jpg


चाळीसगाव /प्रतिनिधी
नॅशनल हायस्कूल, चाळीसगाव येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य ड्रॉइंग ग्रेड परीक्षा सन २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी शाळेतील एकूण ९४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ८८.२९ टक्के इतका लागला आहे.
या परीक्षेत
 १ विद्यार्थी A ग्रेड प्राप्त — रोजमीन अजीज खाटिक
 ६ विद्यार्थ्यांनी B ग्रेड मिळवला
 तर उर्वरित सर्व विद्यार्थी C ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
हा उत्कृष्ट निकाल विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे तसेच कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, कला शिक्षक व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed