डि.आर.कन्या शाळेच्या समीक्षा बिऱ्हाडे ची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड..

अमळनेर : आबिद शेख
येथील डी.आर.कन्या शाळेची इयत्ता आठवी ‘क’ वर्गातील समीक्षा बिऱ्हाडे हिने सादर केलेल्या ‘बायोप्लास्टिक’ या विज्ञान प्रकल्पाची अमळनेर तालुक्यातून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली होती. शिरसोली येथे झालेल्या १३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन (२०२५–२६) मध्ये तिच्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला असून, या यशाच्या जोरावर तिची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
समीक्षा हिने हे यश वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळविले आहे. तिच्या शिक्षणाची व सर्व जबाबदारी तिची आई एकहाती, कष्टाने पार पाडत आहे.
या प्रकल्पासाठी तिला मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती एस.एस. कसबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या विज्ञान मंडळाचे सहकार्य तिला मिळाले.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस.सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका श्रीमती. एस.पी.बाविस्कर,पर्यवेक्षक एस.पी.वाघ,शिक्षक प्रतिनिधी डी.एन.पालवे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी समीक्षा चे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच खान्देश शिक्षण मंडळाच्या नवनिर्वाचित संचाल मंडळाने समीक्षा ला मदतीचे आश्वासन दिले आहे.
