राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी प्रताप महाविद्यालयाच्या ५ महिला खेळाडूंची निवड..

0
New-Doc-01-08-2026-22.29.jpg


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर :- प्रताप वरिष्ठ महाविद्यालयातील महिला क्रिकेट संघाच्या पाच खेळाडूंची आंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सृष्टी शिंदे, भाग्यश्री पाटील, धनश्री पाटील, नंदिनी जाधव व प्राची शिरसाठ या खेळाडूंची बनस्थली विद्यापीठ, निवाई (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून ही स्पर्धा १२ ते १९ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे.
आंतर महाविद्यालय तसेच विभागीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या सर्व महिला क्रिकेटपटूंनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळविले आहे. ही बाब प्रताप वरिष्ठ महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, माननीय कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी.ए. निरज अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, माननीय सचिव प्रा. पराग पाटील, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सर्व उपप्राचार्य, IQAC व RUSA समन्वयक डॉ. मुकेश भोळे, जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर, निवड समिती प्रमुख डॉ. देवदत्त पाटील, एरंडोल विभाग सचिव डॉ. शैलेश पाटील, कुलसचिव राकेश निळे, सर्व जिमखाना समिती सदस्य, क्रिकेट संघ व्यवस्थापक डॉ. सचिन पाटील, क्रीडा शिक्षिका प्रा. अर्चना सचिन पाटील, प्रा. ए. के. अग्रवाल, मिलिंद शिंदे, संजय पवार सर, प्रशांत देवकते तसेच प्रताप महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व खेळाडूंनी निवड झालेल्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed