नंदुरबार नगरपालिकेत शिंदे गटाची सत्ता कायम; भाजप पिछाडीवर, AIMIM ची ऐतिहासिक एन्ट्री..

0
New-Doc-12-25-2025-07.41.jpg


नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. स्थानिक मातब्बर नेते व शिंदे गटाचे विधानपरिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत तब्बल २९ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे नंदुरबार नगरपालिकेवर शिंदे गटाची सत्ता कायम राहिली आहे.
दुसरीकडे, राज्यात सत्तेत असतानाही भाजपला (BJP) मोठा धक्का बसला असून पक्षाला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जोरदार प्रचार आणि अपेक्षा असूनही भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही, त्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
AIMIM ची ऐतिहासिक कामगिरी
या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे AIMIM ची ऐतिहासिक एन्ट्री. पक्षाने पहिल्यांदाच नगरपालिकेत ४ जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली आहे. या विजयानंतर AIMIM चे जिल्हाध्यक्ष सैय्यद फरहत हुसैन यांनी मतदारांचे आभार मानत, हा विजय म्हणजे “नंदुरबारच्या राजकारणातील बदलाची सुरुवात” असल्याचे सांगितले.
काँग्रेसचा सूपडा साफ
या निवडणुकीत काँग्रेसचा पूर्णपणे सूपडा साफ झाला असून पक्षाला एकही जागा मिळवता आलेली नाही. कधीकाळी प्रभावी असलेल्या काँग्रेसच्या या पराभवामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकूणच नंदुरबार नगरपालिकेच्या निकालाने शिंदे गटाचे बळ वाढवले, भाजपला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण केली, तर AIMIM च्या यशामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed