हिंजवडी येथील राज्यस्तरीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दिनेश बागडे यांना सुवर्णपदक..

0
New-Doc-12-13-2025-06.57.jpg

आबिद शेख/अमळनेर

पुणे येथील हिंजवडी येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 105 किलो वजनी गटात दिनेश बागडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यांच्या या दमदार यशामुळे त्यांची 16 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनेश बागडे हे यापूर्वी 2025 मध्ये झालेल्या ‘खेलो इंडिया’ पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाचे मानकरी ठरले असून, 2024 मध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावले होते. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि शिस्तबद्ध सरावाच्या जोरावर त्यांनी ही घवघवीत कामगिरी करत आपल्या नावाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed