प्रभाग १३ (ब) मध्ये बदलाची नांदी; सुनिल महाजन यांची सेवाभावी उमेदवारी चर्चेत..

0
New-Doc-11-30-2025-08.07.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३(ब) मध्ये स्वच्छ, पारदर्शक व सेवा-केंद्रित नेतृत्व देण्याच्या निर्धाराने अपक्ष उमेदवार महाजन सुनिल दयाराम यांनी निवडणुकीत प्रवेश केला आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज क्रमांक ४ मधून उतरलेले महाजन हे स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल, नवपरिवर्तनवादी, सुधारक विचारांचे तसेच समाजकार्यात आघाडीचे मानले जातात.

त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच प्रभागात नवीन ऊर्जेची चर्चा रंगली आहे. न्याय्य, निस्वार्थी व ध्येयवादी नेतृत्वाची गरज अनेक मतदार व्यक्त करत असून महाजन यांच्या सेवाभावी कामांची दखल स्थानिक पातळीवर घेतली जात आहे.
नागरिकांसाठी न्याय्य व प्रामाणिक कामांचा शब्द
सुनिल महाजन यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधत लोककल्याणाचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. कोणतीही गटबाजी, भेदभाव किंवा राजकीय स्वार्थ न ठेवता “न्याय्य, प्रामाणिक आणि बांधिलकीची कामे” करण्याचा शब्द त्यांनी नागरिकांना दिला आहे.
प्रभागासाठी महत्त्वाच्या विकासकामांची व्यापक दिशा महाजन यांनी मतदारांसमोर सादर केलेल्या लोकाभिमुख वचनांमध्ये खालील मुद्दे विशेषत्वाने ठळक आहेत— स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित परिसर निर्मिती पाणीपुरवठ्याची सुसूत्र व्यवस्था
ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा आणि रस्त्यांचे उन्नतीकरण आधुनिक कचरा व्यवस्थापन
महिलांसाठी सुरक्षित वातावरण, सुविधा व उपक्रम
युवकांसाठी मार्गदर्शन, क्रीडा सुविधा आणि रोजगारसंधी ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यकारी योजना परिसरातील अनुशासन, शिस्त व नियोजनबद्ध विकास
“सुंदर शहर – सुंदर परिसर” हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ते घराघरात जाऊन जनजागृती करत असून नागरिकांशी मुद्देसूद संवाद साधत आहेत जनतेला नम्र आवाहन
नागरिकांच्या आशीर्वादाला सर्वोच्च मान देत सुनिल महाजन म्हणतात,
“आपल्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही. अ. क्र. ४ – बॅट चिन्हासमोरील बटन दाबून मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. हा विजय माझा नाही… तो तुमचाच आहे!”
प्रभाग १३(ब) मध्ये सडेतोड, स्वच्छ प्रतिमा व सेवाभावी वृत्ती असलेला उमेदवार म्हणून महाजन सुनिल दयाराम यांच्याकडे मतदार आशावादाने पाहत असल्याचे चित्र सध्या उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed