प्रभाग 12 ‘ब’ ला नवी दिशा देण्याचा निर्धार; प्रताप अण्णा साळींच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास दृढ..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – प्रभाग 12 ‘ब’ मधून नगरसेवक म्हणून निवडून येताच सर्वधर्मसमभाव, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासाचा मार्ग अवलंबण्याचा ठाम विश्वास प्रताप अण्णा साळी यांनी व्यक्त केला आहे. प्रभागातील सर्व घटकांचा सहभाग आणि सर्वांना न्याय देणारे प्रशासन उभारण्याचा त्यांचा संकल्प मतदारांमध्ये मोठ्या आशेचा किरण ठरत आहे.

प्रभागातील नागरिकांमध्ये प्रताप साळी यांच्या निवडीबद्दल उत्साहाचं वातावरण असून, “प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रताप साळीच योग्य, सक्षम आणि आदर्श नेतृत्व” असा ठाम विश्वास मतदारवर्ग व्यक्त करत आहे. प्रभागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग, युवक, व्यावसायिक यांच्याकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रताप छबूलाल साळी हे सातत्यपूर्ण जनसंपर्क, समस्यांची समज आणि तत्परतेने उपाययोजना करण्याची वृत्ती यामुळे लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक ठरत असल्याची सर्वसाधारण भावना निर्माण झाली आहे. त्यांचा नम्र स्वभाव, समस्यांना प्राधान्यक्रमाने हाताळण्याची तयारी आणि विकासकामांबाबतची स्पष्ट दृष्टी यामुळे मतदारांमध्ये विश्वासाचा मजबूत पाया निर्माण झाला आहे.
प्रभाग 12 ‘ब’ मध्ये पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, नागरिक सुविधा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आवश्यक उपक्रम अशा अनेक विकास योजनांना नवा वेग देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे. “विकास हा अधिकार, तडजोड नव्हे” या भूमिकेसह प्रताप साळी यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकासोबत काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.
त्यांच्या निवडीनंतर प्रभागाच्या विकासाला चालना मिळेल, जुनी प्रलंबित कामे वेगाने मार्गी लागतील आणि प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. सर्वांचे हित जपणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून प्रताप साळी यांनी प्रभाग 12 ‘ब’ ला नवी दिशा देण्याची तयारी दाखवली आहे.
