अमळनेर प्रभाग 12 ‘ब’ मध्ये प्रताप अण्णासाहेब साळी यांची समाजाभिमुख कार्यशैली ठरतेय चर्चेचा विषय

0
New-Doc-11-27-2025-19.56.jpg

आबिद शेख/ अमळनेर

प्रभाग क्रमांक 12 ‘ब’ मध्ये सामाजिक कार्य, विकासदृष्टी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रतीक म्हणून प्रताप छबूलाल साळी यांचे नाव वेगाने पुढे येत आहे. 1965 पासून त्यांच्या वडिलांनी जोपासलेली सामाजिक बांधिलकी प्रताप अण्णांनी प्रभावीपणे पुढे नेली असून, अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजहितासाठी आपली निष्ठा सिद्ध केली आहे.

वृद्धांसाठी ‘गार्डन’, महिलांसाठी सक्षमीकरण कार्यक्रम, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती अशी विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी करत त्यांनी विकासाचा मजबूत पाया रचला. माजी नगरसेवक म्हणून कार्य करताना प्रभागातील अनेक महत्त्वाची विकासकामे त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

विशेष म्हणजे पाडळसरे धरणासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं होतं. या घटनेने त्यांच्या समाजकार्यावरील अढळ समर्पणाची साक्ष मिळते. या लढ्यामुळे प्रभागातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर व विश्वास निर्माण झाला आहे.

प्रभाग 12 ‘ब’ मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सर्वधर्मसमभावाचा आणि सर्वसमावेशक विकासाचा मार्ग स्वीकारत प्रभागाला नवी दिशा देण्याचा विश्वास प्रताप अण्णा साळी यांनी व्यक्त केला आहे.

मतदारांमध्येही त्यांच्याविषयी उत्स्फूर्ततेचं वातावरण असून, “प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रताप साळीच योग्य आणि आदर्श उमेदवार” असल्याचं मत मोठ्या प्रमाणावर व्यक्त केलं जात आहे.

प्रताप छबूलाल साळी हे विश्वासू, कार्यक्षम आणि समाजाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक ठरत असून, त्यांच्या निवडीमुळे प्रभाग 12 ‘ब’ च्या विकासाला गतिमान वेग मिळणार, अशी मतदारांची ठाम भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed