अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग 13(ब) मध्ये ‘छत्री’ चिन्हाचे उमेदवार शेखा मिस्त्री यांचे मतदारांना आवाहन

0
New-Doc-11-27-2025-11.19.jpg

आबिद शेख अमळनेर

अमळनेर – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 13(ब) मधील स्वतंत्र अपक्ष उमेदवार शेख सलीम फत्तू (शेखा मिस्त्री) यांनी मतदारांशी संवाद साधत जबरदस्त उत्साहात प्रचार मोहीम राबविली आहे.

नागरिकांसाठी, नागरिकांमधून उभा राहिलेला आणि खऱ्या अर्थाने “आपला हक्काचा माणूस” असल्याचा दावा करत त्यांनी प्रभागातील सर्वसाधारण मतदारांना विकासासाठी स्वतःला संधी देण्याचे आवाहन केले आहे.

मंगळवार, दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होणार असून, पारदर्शक, स्वच्छ आणि विकासाभिमुख कारभारासाठी स्वतःला कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारांनी ईव्हीएमवरील ‘छत्री’ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, अशी त्यांची नम्र विनंती आहे. प्रभागातील सर्वांगीण विकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ उपाय यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मतदारांना स्मरण म्हणून ईव्हीएमवरील मतपत्रिकेचा रंग फिकट निळा असेल, याचीही त्यांनी विशेष सूचना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed