अमळनेर वकील संघाचा अमळनेर शहर विकास आघाडीला ठाम पाठिंबा; जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील मान्यवर वरिष्ठ वकीलांनी आज एकमताने अमळनेर शहर विकास आघाडीला स्पष्ट आणि ठाम समर्थन जाहीर केले आहे. न्याय, प्रामाणिकपणा आणि शहराच्या न्याय्य विकासावर विश्वास ठेवणाऱ्या वकील संघाने दिलेला हा पाठिंबा आगामी नगरपरिषद निवडणुकीत आघाडीला मोठी ताकद देणारा ठरत आहे.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास ठेवत वकील संघाने शहराच्या प्रगतीच्या वाटचालीला बळकटी दिली आहे. शहरात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची इच्छाशक्ती, सुٹसुटीत भूमिका आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन यामुळे ठाकूर हे सक्षम नेतृत्व म्हणून उदयास येत असल्याचे मत वकील संघाने व्यक्त केले.
विचार, न्याय आणि न्याय्य विकासाच्या मार्गावर उभी राहिलेली ही साथ—
अमळनेरमध्ये परिवर्तनाच्या नवीन पर्वाची सुरूवात असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
अमळनेर शहर विकास आघाडीला मिळालेल्या या भक्कम पाठिंब्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच रंगणार असून, शहरात “अमळनेर बदलणारच!” अशी जनभावना दृढ होत आहे.
