प्रभाग 12-ब मध्ये प्रताप साळी यांच्या प्रचाराला जोरदार उत्स्फूर्त प्रतिसाद; विकास कामांमुळे वाढला नागरिकांचा विश्वास..
आबिद शेख/ अमळनेर
नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12-ब मध्ये अमळनेर शहर विकास आघाडीचे उमेदवार प्रताप छबूलाल साळी यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साधेपणा, प्रामाणिक स्वभाव आणि भागासाठी सातत्याने केलेली कामे या सर्व गुणांमुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष विश्वास निर्माण झाला आहे.

नागरिक—वयोवृद्ध, महिला, तरुण वर्ग—यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत त्यांना सक्रिय पाठिंबा दर्शविला.
प्रचारादरम्यान नागरिकांनी प्रताप साळी यांच्याशी संवाद साधताना, त्यांच्या स्वभावातील साधेपणा, सर्वांशी समभावाने बोलण्याची पद्धत आणि नेहमी उपलब्ध असण्याची वृत्ती याचे कौतुक केले. काही ठिकाणी महिलांनी तर घरांबाहेर येऊन त्यांचे स्वागत करत “भागासाठी काम करणारा माणूस हवा” अशी भूमिका घेतली.
यावेळी प्रताप साळी यांनी नागरिकांचे आभार मानत स्पष्ट केले की,
“प्रभाग 12-ब चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास माझी प्रेरणा आहे. पुढील काळात रस्ते, पाणी, स्वच्छता यासोबतच महिला-युवा विकासावर विशेष भर देणार आहे.”
प्रभागातील वातावरण पाहता प्रताप साळी यांच्या प्रचाराला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. आगामी निवडणुकीत त्यांचा मजबूत प्रभाव जाणवत असून, प्रभाग 12-ब मधील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि सकारात्मक चर्चा रंगल्या आहेत.

