वारसातली सेवा… जनतेचा अपार विश्वास! अमळनेर शहर विकास आघाडीच्या उमेदवारीला मिळतोय उत्साहपूर्ण प्रतिसाद..

0
New-Doc-11-25-2025-23.52.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :अमळनेर शहरातील लोकसेवेचा ६० वर्षांहून अधिक प्रदीर्घ वारसा जपणाऱ्या साडी कुटुंबाने यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर केली असून, भागातील नागरिकांकडून त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. आपल्या सुख-दुःखात नेहमी सोबत राहून विकासाला अग्रक्रम देण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी तमाम मतदार बांधवांना साष्टांग नमस्कार करीत आशीर्वाद मागितला आहे.

१९६५ पासून अविरत लोकसेवा – तीन पिढ्यांचा जनतेशी अटूट संबंध

अमळनेर नगरीत १९६५ पासून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात साडी कुटुंबाने सतत योगदान दिले आहे.
या कार्याला पायाभरणी करणारे स्व. आप्पासो छबुलाल देवाजी साडी यांनी १९६५ ते १९८० या १५ वर्षांच्या काळात नगरसेवक म्हणून अविरत सेवा बजावली. पैलाड भागातील गरीब, गरजू, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य आणि वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही ज्येष्ठ नागरिक प्रेमाने सांगतात.
किराणा दुकानाच्या माध्यमातून उधार, उसनवार, लग्नकार्य आणि संकट काळात केलेली मदत — या त्यांच्या कार्याची आठवण आजही ५०-६० वर्षांनंतरही लोकांच्या मनात ताजी आहे.
आप्पांच्या स्वर्गवासाला ४१ वर्षे उलटून गेली, तरी त्यांच्या सेवाभावाची छाप जनतेच्या हृदयात कायम आहे, हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे मोठे बळकटीकरण म्हणावे लागेल.

लोकसेवेची परंपरा पुढील पिढीकडून कायम

आप्पांच्या प्रेरणेवरून भावंडांनीही जनसेवेची परंपरा पुढे चालू ठेवली.

  • १९९१ मध्ये प्रताप साडी (अण्णा) यांना नगरसेवक म्हणून नागरिकांनी निवडून दिले.
  • १९९६ मध्ये संगीत प्रताप साडी या नगरसेविका म्हणून निवडून आल्या.

यानंतरही जनतेचा विश्वास कायम राहिला आणि

  • २०१६ मध्ये दीपक आबा साडी यांना अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड मिळाली, ज्यातून जनतेने दाखवलेला विश्वास अधिक दृढ झाला.

एकदिलाने चालणारा कुटुंबाचा सेवा-व्रत

साडी कुटुंब एकदिलाने, एकमताने संघटित पद्धतीने समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करत आले आहे. नागरिकांचा विश्वास, पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत राहावा, हीच त्यांची अपेक्षा आहे.
जनतेची सेवा हीच आमची ओळख आणि परंपरा,” असे मत उमेदवारांनी व्यक्त केले आहे.

उमेदवारी जाहीर – विकासाचा संकल्प

अमळनेर शहर विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर करताना त्यांनी सांगितले की—
“आम्ही आपल्या भागातील विकासासाठी आणि कोणत्याही सुख-दुःखात तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी उमेदवारी करत आहोत. आपले एकमताने दिलेले मत व आशीर्वाद आम्हाला पुन्हा एकदा सेवेची संधी देईल.”

मतदारांमध्ये चर्चेचा विषय – ‘विश्वासाची परंपरा’

साडी कुटुंबाचा ६० वर्षांचा विश्वासाचा वारसा, प्रामाणिक सेवा आणि लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते हा या निवडणुकीतील प्रमुख चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची उमेदवारी सकारात्मक चर्चेत असून अनेकांनी खुले पाठिंबा जाहीर करायला सुरुवात केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed