प्रभाग १ मध्ये नरेंद्र चौधरी यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद; बदलाच्या अपेक्षेने मतदारांचा कल वाढला..

0
New-Doc-11-24-2025-23.32.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचाराची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असून उमेदवार नरेंद्र चौधरी यांच्या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विविध वस्तीभेटी, संपर्क दौरे आणि घराघरातील संवादाद्वारे प्रचाराचा जोर वाढत असताना स्थानिक मतदार मोठ्या प्रमाणात पाठिंबा देताना दिसत आहेत.

चौधरी यांनी प्रभागातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, महिला व युवकांसाठी उपयुक्त योजना, तसेच आवश्यक नागरी सुविधांबाबत मांडलेले नियोजन आणि पुढाकार याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक मतदारांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत काही महत्त्वाच्या नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून आता बदलाची अपेक्षा वाढत आहे. त्यामुळेच नागरिक मोठ्या संख्येने चौधरी यांच्या प्रचार सभांना उपस्थित राहात आहेत.

प्रचार दौऱ्यात नरेंद्र चौधरी यांनी विकासाभिमुख, सर्वसमावेशक आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत सर्व घटकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः तरुण मतदारांमध्ये सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.

स्थानिक राजकीय निरीक्षकांच्या मते, सध्या प्रचाराचा वाढता जोर पाहता प्रभाग क्रमांक 1 मध्ये निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed