माजी आमदार चौधरींच्या ‘दुपट्टी भूमिके’वर सवाल;
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : अमळनेर नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगात आली असताना शहर विकास आघाडी आणि शिंदे सेनेतील आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. मात्र या सर्व वातावरणात माजी आमदार चौधरी यांच्या दुपट्टी भूमिकेवर सर्वाधिक चर्चा सुरू असून अनेकांकडून त्यांच्यावर सवालांचा भडिमार होताना दिसत आहे.

शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळालेले जितेंद्र (जितू) ठाकूर हे सडेतोड व्यक्तिमत्व, मनमिळाऊ स्वभाव आणि मजबूत मित्रपरिवारामुळे ओळखले जातात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर पत्रकारिता क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले. अनेकांना न्याय मिळवून देणे, गैरप्रकारांचा पर्दाफाश करणे, चुका दाखवून देताना कोणतीही भीड-भीव नसणे—यामुळेच त्यांना समाजहिताचा आवाज म्हणून मान्यता मिळाली.
त्यांनी आजी-माजी आमदारांच्या चांगल्या कामाचे कौतुक करतानाच, चुकीवर ताशेरे ओढायलाही कधी मागे-पुढे पाहिले नाही. परंतु आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर अचानक माजी आमदार चौधरींकडून त्यांच्यावर टीकेची मालिका सुरू झाली असून, आपला उमेदवार निष्कलंक दिसावा म्हणून समोरच्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप शहरात चर्चेत आहे.
“दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं की चार बोट स्वतःकडे असतात, हे दादांनी विसरू नये.
‘माजी आमदार दादांनी इतका पैसा कसा कमावला?’ हा प्रश्न जनता विचारत आहे,”
असा स्वर नागरिकांमध्ये ऐकू येऊ लागला आहे.
पत्रकारितेत सकारात्मक बातमी दिली तर चांगले, पण त्रुटी दाखवल्या की टीका करणारे—असे म्हणत माजी आमदारांनी अनेक पत्रकारांचा रोष ओढवून घेतल्याचेही समोर येत आहे. या सर्व वक्तव्यांचा राजकीय परिणाम आगामी काळात दिसणार, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.
