बाजारपेठेतील तुफान उत्साह!जितेंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांच्या प्रचार दौऱ्याला व्यापाऱ्यांचा जबरदस्त पाठिंबा..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांच्या बाजारपेठेतील प्रचार दौऱ्याला आज व्यापारी वर्गाकडून अभूतपूर्व आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेत निघालेल्या या प्रचारफेरीत व्यावसायिकांनी थेट संवाद साधत ठाकूर यांना ठोस पाठिंबा जाहीर केला.
प्रचार दौऱ्यादरम्यान जितू ठाकूर यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत व्यापारविषयक अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न, पार्किंगची समस्या, पायाभूत सुविधांची कमतरता अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी अनेक व्यापारी बांधवांनी—
“आपल्या व्यापारी वर्गाचा खरा साथीदार जितू भाऊच नगराध्यक्षपदी विराजमान होणार!”अशी एकमुखाने प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले की,शहरातील व्यापार-वाणिज्याला गती देणे स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज बाजारपेठ तयार करणे पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणी दूर करणे व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे प्राधान्याने निवारण करणे
या सर्व गोष्टींना ते प्रमुख्याने प्राधान्य देणार आहेत.
प्रचारफेरीदरम्यान नागरिक, महिला, तरुण आणि व्यावसायिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून,
“अमळनेरच्या विकासासाठी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षित उद्यासाठी जितू ठाकूर यांनाच विजयी करा!”
असे आवाहन व्यापारी वर्गातून जोरदार करण्यात येत आहे.
ही प्रचारफेरी शहरातील निवडणूक वातावरणात नवीन उर्जा आणि उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.
