प्रभाग १३ (अ) मध्ये शेख जुबेदा बी यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : प्रभाग १३ (अ) मधील नागरिकांनी शहर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शेख जुबेदा बी हाजी नसिरोद्दीन यांच्या प्रचाराला दिलेला उत्स्फूर्त आणि वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.
“आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे मोठे बळ आहे,” असा निर्धार व्यक्त करत शेख जुबेदा बी प्रभागातील सर्व स्तरांतील मतदारांशी सातत्याने संवाद साधत आहेत. त्यांचे साधे, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्या प्रभागात लोकप्रिय आहेत.
प्रभाग १३ (अ) च्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी खालील प्रमुख मुद्द्यांवर भर देण्याची ग्वाही दिली आहे—
शहरी विकास व रस्ते सुधारणा
नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा
स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण
महिला सबलीकरणासाठी उपयुक्त उपक्रम
युवकांसाठी कौशल्यविकास व रोजगारसंधी निर्माण
नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण
शहर विकास आघाडीने अनुभवी, प्रामाणिक व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून शेख जुबेदा बी यांच्यावर दाखवलेला विश्वास प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. त्यांच्या समर्थनार्थ वाढता उत्साह दिसून येत असून नागरिक त्यांना जबाबदार, सक्रिय आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पाहत आहेत.
लवकरच ‘प्रभागाच्या प्रगतीचा नवा अध्याय’ या मुख्य संदेशासह त्या घरोघरी जाऊन जनसंपर्क मोहीम राबवत आहेत. वाढत्या जनसमर्थनामुळे त्यांच्या प्रचाराला आणखी वेग मिळताना दिसत आहे.
