अमळनेर नगर पालिका निवडणूक 2025 पार्श्वभूमी : अमळनेर पोलीसांकडून ऑल आऊट / कोबिंग ऑपरेशन..

0
New-Doc-11-23-2025-07.45.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर उपविभागातील अमळनेर, पारोळा व एरंडोल येथे होणाऱ्या सार्वत्रिक नगर पालिका निवडणूक-2025 ची महत्त्वाची प्रक्रिया सुरू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलीसांकडून पहाटे ऑल आऊट / कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच अभिलेखावरील गुन्हेगारांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी मा. महेश्वर रेड्डी (सो.), पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार हे विशेष ऑपरेशन हाती घेण्यात आले. आज दिनांक 21.11.2025 रोजी सकाळी 4.00 ते 7.00 वाजेदरम्यान अमळनेर शहरात कोंबिंग ऑपरेशन पार पडले.

नेतृत्व व सहभागी पथके
सदर ऑपरेशनचे नेतृत्व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक बाजीराव कोते यांनी केले.
कार्यवाहीत पोलीस निरीक्षक दत्तात्रये निकम, अमळनेर पोलीस स्टेशनचे 05 अधिकारी आणि 45 पोलिस अंमलदारांचा सहभाग होता.
कार्यवाहीसाठी 5 स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या होत्या.
कारवाईचे तपशील
कोंबिंग ऑपरेशनदरम्यान NBW/BW वॉरंटातील आरोपी, हदपार गुन्हेगार, दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेले व्यक्ती, शरीराविरुद्ध व मालमत्तेवरील गुन्हेगार तसेच हिस्ट्रीशीटर अशा एकूण 27 जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.
त्यांना आदर्श आचारसंहितेबाबत कडक सूचना देण्यात आल्या.
1 गुन्हा प्रोव्हिबिशनखाली दाखल
4 आरोपींवर NBW वॉरंटची बजावणी करून अटक
शांतता राखण्यासाठी कडक सूचना
आगामी नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अमळनेर शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांनी सर्वांना कडक सूचना दिल्या आहेत.
अमळनेर पोलीस सतर्क असून, निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय तातडीने करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed