प्रभाग १३-ब मधील उमेदवार जुबेदाबी शेख यांच्या प्रभागात भव्य रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेरमध्ये भव्य आणि उत्साहवर्धक रॅलीचे आयोजन करण्यात आले. अमळनेरचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादासाहेब अनिल भाईदास पाटील तसेच अमळनेर नगरपालिकेचे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर)जुबेदाबी शेख यांच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली.
रॅलीची सुरुवात पंचमुखी महादेव मंदिर, माळीवाडा येथे महादेवाच्या दर्शनाने करण्यात आली. त्यानंतर रॅलीने माळीवाडा, भांडारकर गल्ली, पाठक गल्ली, मशिद चौक, झामी चौक, साळी वाडा, न्हावी वाडा आणि मेन रोड या मार्गाने भव्य प्रस्थान केले.
या रॅलीत प्रभाग १३-ब च्या उमेदवार जुबेदाबी शेख या विशेषतः अग्रस्थानी दिसून आल्या. त्यांच्या नेतृत्वाला मतदार, नागरिक, कार्यकर्ते आणि महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
रॅलीचे खास वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लिम बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती. महादेव मंदिर परिसरात मुस्लिम बांधव, भगिनी तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सामाजिक सौहार्द आणि एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला गेला.
रॅलीत आदिवासी ठाकूर समाज बांधवांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असून त्यांनी उमेदवारांचा उत्साह वाढविला. रॅलीतील सर्व सदस्यांनी गल्ल्यांमधील मतदारांना अभिवादन करून मतदानाबाबत जागरूकता निर्माण केली.
संपूर्ण रॅली अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत केले आणि निवडणुकीत सहभागाबाबत सकारात्मक संकेत दिले.
कार्यक्रमाची सांगता समाधानकारक वातावरणात झाली. समाज बांधवांनी आज दिलेला मोठा प्रतिसाद येणाऱ्या काळातही असाच कायम ठेवावा, तसेच ग्रुपवरील संदेशानुसार मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली.
