अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग १३ (अ) साठी जुबेदाबी शेख यांचा विकासाचा संकल्प..

0
New-Doc-11-22-2025-07.11.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे प्रभाग क्र. १३ (अ) येथील नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवारांनी जनतेच्या हक्कासाठी “विकासाचा चेहरा” म्हणून सर्वांगीण विकासाचे भक्कम संकल्प जाहीर केले आहेत.
प्रभागातील मागील अनेक वर्षांपासून सक्रिय सामाजिक कार्य करताना मिळालेल्या अनुभवावर आधारित त्यांनी नागरिकांसाठी ठोस योजना आणि उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
उमेदवारांचे प्रमुख विकास संकल्प :
महिला व बालविकास उपक्रम
प्रभागातील रिकाम्या जागेत लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी साहित्य उपलब्ध करून देऊन मुलांना मोबाइलपासून दूर ठेवत शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प.
प्रत्येक महिन्यात जनता दरबार
नागरिकांच्या अडचणी, तक्रारी तसेच शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार भरविणार.
नागरिकांच्या शासकीय कामांना गती
शासकीय कार्यालयात प्रलंबित कामे किंवा संबंधित विभागांतील तक्रारींचा पाठपुरावा करून नागरिकांची कामे त्वरित मार्गी लावण्याचा प्रयत्न.
उघड्या गटारांना झाकणांची सुविधा
प्रभागातील उघडी गटारे झाकून रोगराई, डास व घाणीचा त्रास कमी करून आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा निर्धार.
खराब रस्त्यांची दुरुस्ती व फेव्हर ब्लॉक बसविणे
प्रभागातील निकृष्ट व खराब रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी फेव्हर ब्लॉक बसविले जातील.
पाणीपुरवठ्यात सुधारणा
शहरात ४–५ दिवसातून एकदाच होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न.
प्रभाग पूर्णपणे अंधारमुक्त करण्याचा संकल्प
अनेक ठिकाणी लाईट असूनही दिवे न लागणे तसेच काही ठिकाणी लाईट कनेक्शन नसल्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व गल्ली-बोळांमध्ये स्ट्रिट लाईटची योग्य व्यवस्था करून प्रभाग अंधारमुक्त करण्याचे आश्वासन.
उमेदवारांनी प्रभाग क्र. १३ (अ) च्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदार व पारदर्शक कार्यपद्धतीने काम करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरवून प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed