“लोकांचा हक्काचा माणूस” सलीम शेख (शेखा मिस्त्री) यांना प्रभाग १३(ब) मध्ये उत्स्फूर्त पाठिंबा

0
New-Doc-11-18-2025-21.31.jpg

आबिद शेख/अमळनेर

खारोट कब्रस्तान वालकंपाऊंड

अमळनेर : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांत विकासकामांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यात प्रभाग क्रमांक १३ (ब) हा विशेष चर्चेत असून, या सर्वसाधारण मतदारसंघात हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री) हे लोकांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू बनले आहेत.
“बोलण्यात नाही तर, कामात विकास दिसतो!” या तत्वावर काम करत त्यांनी प्रभागातील नागरिकांसाठी छोटी-मोठी अनेक कामे उभी केली आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सातत्याने विकासाला प्राधान्य देत त्यांनी केलेली कामगिरी सध्या भागातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.
खारोट कब्रस्तान प्रश्न मार्गी — मोठा दिलासा!
खारोट कब्रस्तान हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला संवेदनशील प्रश्न. दोन समाजांमध्ये असलेला वाद मिटवून, अधिकाऱ्यांच्या मदतीने तो सुटावा यासाठी शेखा मिस्त्री यांनी पुढाकार घेतला आणि हा प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या कुशल समन्वयाची भागात मोठी दाद मिळत आहे.
वालकंपाऊंड — विकासाची ठळक नोंद
वालकंपाऊंडचे काम हे त्यांच्या विकासविषयक दृष्टीकोनाचे ज्वलंत उदाहरण म्हणून समोर आले आहे. नागरिकांच्या अडचणी ओळखून त्यावर तातडीने व ठोस उपाय करणं, हा त्यांचा लोकाभिमुख दृष्टिकोन प्रभागात अधोरेखित करत आहे.
नागरिकांचा वाढता विश्वास नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ (ब) मध्ये हाजी सलीम शेख फत्तू यांना मिळणारा लोकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
भागातील नागरिकांच्या मते
“शेखा मिस्त्री यांनी केलेले काम दिसते… बोलून नाही, प्रत्यक्ष विकास करून दाखवतात!”
आगामी निवडणुकीत नागरिकांना त्यांचे काम किती भावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed