भडगावातून गायब झालेल्या ३ अल्पवयीन मुलींचा थरारक तपास. — पोलिसांची संयुक्त कारवाई; राजस्थानमधून मुली सुखरूप परत..

0
New-Doc-11-14-2025-10.22.jpg

24 प्राईम न्यूज 14 Nov 2025

दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून 03 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. मुलींच्या नातेवाईकांनी गावात व परिसरात शोध घेतला, परंतु काहीच माहिती मिळाली नाही. त्याचदरम्यान फिर्यादीची पुतणी देखील बेपत्ता झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
फिर्यादीने तात्काळ भडगाव पोलीस स्टेशनला येऊन दिलेल्या तक्रारीनुसार गु.र.न. 380/2025 व 381/2025, बी.एन.एस. कलम 137(2) प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. एका गावातून आणि एकाच कुटुंबातून 03 मुली बेपत्ता झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते.
जळगावचे मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाचा तपास तात्काळ वेगात व काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले. मुलींच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांची चौकशी केल्यानंतर जवळपासच्या परिसरातील 03 तरुण मुलेदेखील बेपत्ता असल्याचे आढळले.
सर्व मुला-मुलींचे मोबाईल बंद असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला. दोन स्वतंत्र पथके जळगाव व चाळीसगाव येथे रवाना करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये धागा — झेलम एक्सप्रेसने प्रवास
जळगाव रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दि. 20 ऑक्टोबर रोजी रात्री 1.22 वाजता तीन संशयित मुलगे व तीन बेपत्ता मुली दिसून आल्या. तपासानुसार त्यांनी झेलम एक्सप्रेसने प्रवास केल्याचे स्पष्ट झाले.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तांत्रिक तपासाचा वेग वाढवण्यात आला.
राजस्थानमध्ये धडाकेबाज कारवाई — तीन आरोपी अटकेत, मुलींची सुटका
तांत्रिक तपास, नातेवाईकांची चौकशी आणि सततच्या प्रयत्नांनंतर आरोपी :

  1. रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे
  2. अजय सुकलाल देवडे
  3. अमोल इश्वर सोनवणे
    यांना राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले.
    तिन्ही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात पोलीस यशस्वी झाले.
    हा तपास खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला :
    मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी
    मा. अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम, चाळीसगाव विभाग
    मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकुरवाड, चाळीसगाव विभाग
    तपास करणारी टीम : पोलीस निरीक्षक महेश शर्मा,
    पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे,
    पोहेकाँ/ पांडुरंग पाटील,
    पोना/ मनोहर पाटील,
    पोकाँ/ महेंद्र चव्हाण,
    पोकाँ/ प्रविण परदेशी,
    पोकाँ/ मिलींद जाधव,
    मपोकाँ सोनि सपकाळे इत्यादी कर्मचारी.
    पालकांना पोलिसांचे आवाहन
    जळगाव पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे,
    तसेच अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed