“कोकणरत्न” समाजसेवक सन्मानासाठी डॉ. विनय तळावडेकर यांची निवड..

0
New-Doc-11-14-2025-22.22.jpg

24 प्राईम न्यूज 15 Nov 2025

मुंबई :स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे “कोकणरत्न” पदवी प्रदान सोहळा शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सायं. 4 ते 6 या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय कोकरे सर भूषवणार आहेत.

या सोहळ्यास मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कुवेसकर, खजिनदार श्री राजेंद्र सुर्वे, नेते श्री सुभाष राणे, मुख्य सल्लागार श्री दिलीप लाड यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

मुंबई येथील डॉ. विनय विजय तळावडेकर (निसर्गोपचार तज्ञ) यांना सामाजिक आरोग्यसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “कोकणरत्न (समाजसेवक)” ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. तळावडेकर यांनी निसर्गोपचार, अरोमा थेरपी, ऍक्युप्रेशर, डाएट अँड डिटॉक्स पद्धती, भारतीय शास्त्रीय मसाज, कायरोपॅथी, रोप अँड रोलर, हॅमर, मोक्सा, गौशा, टीशू रिपेअर थेरपी तसेच अध्यात्मिक मार्गदर्शन अशा एकत्रित आरोग्यपद्धतींमार्फत गेल्या 16 वर्षांपासून गोरगरीब रुग्णांची मन:पूर्वक सेवा केली आहे.

यापूर्वी मुंबईच्या केईएम रुग्णालयात 28 वर्षे वरिष्ठ क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक आरोग्यसेवेसाठी स्वतःला पूर्णवेळ वाहून घेतले. गुडघेदुखी, कंबर दुखी, मान दुखी, टाचा दुखी यांसह विविध आजारांवर त्यांनी शेकडो रुग्णांना उपचारातून दिलासा दिला आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशील गृहनिर्माण संस्था (सायन), भालचंद्र सुभाष सत्कार्य सेवा समिती (मुंबई) आणि ओमकार अंध अपंग सामाजिक संस्था (भांडुप) यांनी दोन दिवसीय मोफत वैद्यकीय शिबिरांचे यशस्वी आयोजन केले होते.

डॉ. तळावडेकर यांच्या सामाजिक व आरोग्यसेवेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना यापूर्वी अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, त्यापैकी प्रमुख—

  1. राष्ट्रीय प्रतिभा सन्मान – वर्थी वेलनेस फाउंडेशन ट्रस्ट, लखनऊ
  2. राज्यस्तरीय आरोग्यदूत समाज रत्न पुरस्कार – अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच, नाशिक
  3. आरोग्यविभूषण पुरस्कार – हेल्थ व्ह्यूज, वाशी
  4. इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड – वर्ल्ड रेकॉर्ड सोल्युशन अँड अवॉर्ड्स प्रा. लि., बरेली
  5. भारत ज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स अवॉर्ड – महाराष्ट्र फाऊंडेशन, पुणे
  6. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार – ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र
  7. नेच्युरोपॅथी एक्सलन्स अवॉर्ड – आयुष कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, बिहार

डॉ. तळावडेकर यांच्या समाजकार्याचा गौरव करणारा “कोकणरत्न” पुरस्कार सोहळा हा कोकणासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed