वावडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दिपक पाटील, व्हाईस चेअरमन कैलास पाटील — बिनविरोध निवड..
आबिद शेख/अमळनेर

वावडे : वावडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक आज शांततेत पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदी दिपक मणिलाल पाटील तर व्हाईस चेअरमनपदी कैलास चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी पी. एस. महाजन व सोसायटीचे सचिव अरुण काशिनाथ पाटील यांच्या उपस्थितीत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
निवडणुकीनंतर नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार अधिकार नथू पाटील आणि अरुण काशिनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्यांचा माजी सदस्यांकडूनही गौरव करण्यात आला.
या प्रसंगी माजी चेअरमन लताबाई नरेश पाटील, माजी व्हाईस चेअरमन पांडुरंग तीरसिंग भिल, अधिकार अमृत वानखेडे, नथू सखाराम पाटील, चंद्रकांत भास्कर पाटील, राजेंद्र अभिमान पाटील, शांताराम फकीरा पाटील, किशोर गौतम पाटील, सीमा अधिकार पाटील, शरद छगन लोहार, शिवाजी सिताराम पाटील, सरपंच कोकीळाबाई प्रल्हाद पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, भगवान दीपचंद पाटील तसेच गावातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदरील निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याने वावडे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

