पत्रकार सुरक्षा विधेयकात सुधारणा करण्यासाठी देशभरातील पत्रकारांची एकजूट – बिलासपूर येथे राष्ट्रीय अधिवेशनात ठराव पारित. दै. मुंबई हलचलचे संपादक दिलशाद एस. खान यांचा सन्मान..
24 प्राईम न्यूज 7 Nov 2025
बिलासपूर : छत्तीसगडमध्ये पत्रकार सुरक्षा विधेयकात सुधारणा करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी बिलासपूर येथे भव्य राष्ट्रीय अधिवेशन व पत्रकारिता संरक्षण संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले.
या अधिवेशनात देशभरातील अनेक राज्यांतील वरिष्ठ पत्रकार, संपादक आणि संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून दिल्लीचे वरिष्ठ पत्रकार श्री शीतल पी. सिंह, भोपालचे श्री सुनील सिंह बघेल, रायपूरचे श्री विश्ववेश ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून श्री शंकर पांडेय, विशेष अतिथी म्हणून दै. मुंबई हलचल चे संपादक श्री दिलशाद एस. खान (महाराष्ट्र), श्री हर हर शंभू (ओडिशा), श्री जमील खान (मध्यप्रदेश), श्री दिलीप यादव (बिलासपूर प्रेस क्लब अध्यक्ष), श्री सुनील सिंह (उत्तरप्रदेश), रईस खान (राजस्थान), श्री सदानंद (गोवा), अजय प्रताप सिंह (उत्तरप्रदेश), मयूरदान गंढवी (गुजरात), श्री सरोज जोशी (महाराष्ट्र), श्री गोपाल सिंह (उत्तरप्रदेश) आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष श्री जिग्नेश कालावाडिया (गुजरात) होते.
संगोष्ठी दरम्यान श्री शीतल पी. सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले की देशातील फक्त तीन राज्यांमध्ये पत्रकार सुरक्षा कायदा लागू झाला आहे – त्यात तमिळनाडूचा कायदा काही प्रमाणात प्रभावी आहे, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर छत्तीसगडचा कायदा अत्यंत कमकुवत आहे आणि त्यात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे. पुढील कायदा केरळमध्ये लागू होणार असून तो अधिक सक्षम असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
इतर वक्त्यांनीही पत्रकारांच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की स्वतंत्र आणि सुरक्षित पत्रकारितेसाठी देशभर समान व सशक्त कायदा लागू होणे अत्यंत गरजेचे आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष श्री कालावाडिया यांनी सांगितले की अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचा उद्देश एकच आहे – “संपूर्ण देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू करणे.”
राष्ट्रीय उपाध्यक्ष राकेश प्रताप सिंह परिहार, नितिन सिन्हा, दै. मुंबई हलचल चे संपादक श्री दिलशाद एस. खान, राष्ट्रीय महासचिव महफूज खान, रत्नाकर त्रिपाठी, राष्ट्रीय सचिव सुनील चौधरी यांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.
छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष गोविंद शर्मा यांनी सांगितले की सध्याच्या विधेयकात पत्रकारांच्या सुरक्षेपेक्षा अधिक भर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर दिला गेला आहे, त्यामुळे यात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की मागण्या मान्य न झाल्यास पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत.
या अधिवेशनात देशभरातील विविध राज्यांतील तसेच छत्तीसगडमधील जिल्हे व तालुक्यांमधून शेकडो पत्रकारांनी सहभाग नोंदवला आणि पत्रकार सुरक्षा विधेयकात सुधारणा करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.