अमळनेर मानव केंद्रात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी — नामसप्ताहाची भक्तिमय सांगता..

0
New-Doc-11-06-2025-22.48.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : अमळनेर येथील मानव केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुनानक जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक प्रबंधक समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या नामसप्ताह कार्यक्रमाची सांगता ५ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुनानक जयंतीच्या मंगलदिनी झाली.

सकाळी भजन-गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत प्रोजेक्टरवर मौजुदा गुरुदेव संत बलजीतसिंहजी महाराज यांच्या प्रवचनाचा आस्वाद भक्तांनी घेतला.

सत्संगामध्ये गुरुदेवांनी सांगितले, “सगळ्यांमध्ये एकच परमेश्वर आत्म्याच्या रूपाने वास करतो. कर्म असे करा की आपण परमेश्वराच्या कृपेस पात्र ठरू. परमेश्वरासाठी एक पाऊल पुढे चला, तो तुमच्यासाठी दहा पाऊले पुढे येईल. देव बाहेर नाही, तो आपल्यातच आहे आणि त्याला ओळखण्यासाठी पूर्ण गुरूची आवश्यकता असते.” त्यांनी पुढे म्हटले, “हा गुरूंचा दरबार आहे — येथे सर्वांना परमेश्वर प्राप्तीची समान संधी उपलब्ध आहे. परमेश्वर भक्तीमार्गावर चालणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभा राहतो.”

सत्संगानंतर जवळपास दोन हजार भाविकांनी लंगर महाप्रसादाचा लाभ श्रद्धेने घेतला. या प्रसंगी माजी जि.प. सदस्य जयश्रीताई पाटील यांनी उपस्थित राहून गुरुदेवांचे आशीर्वाद घेतले, तर खासदार स्मिताताई वाघ यांनी शुभेच्छा संदेश पाठवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमळनेर, चोपडा, धुळे व पारोळा परिसरातील सुमारे १०० सत्संगी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात केंद्राचे सेवेदार प्रबंधक योगेश कुमावत, राजेशदादा सोनार, रविंद्र बोरसे, आनंदा नाना पाटील (नंदगाव), दिपक सोनार, गयभू नाना पाटील (सनपुले), गिरीधर बापू, विजय पितांबर पाटील, संजय चौधरी, नंदुभाऊ चौधरी, भगवान चौधरी, नानाभाऊ कुंभार, पप्पू कासार, महाले साहेब (पवन चौक), समाधान पाटील, नंदू पाटील (तळवाडे), चेतन वानखेडे (मांडळ), श्री चित्ते साहेब, भावसार दादा (तांबेपुरा), एस.टी. पाटील (मुडी), पिंटू गिरासे (भिलाली), जगदीश निकम (रोटवद), सुभाष पाटील (पातोंडा), भास्कर आप्पा कुमावत (नांद्री), एम.जी. पाटील (पारोळा), राजू महाले (एरंडोल), विजय चौधरी (धरणगाव), राजूभाऊ पाटील, दिपक पाटील (धुळे), बाबुलाल महाजन (अंबापिंप्री), युवराज भाऊ (देवळी), कल्पनाताई (अमळगाव), संतोष दंगल पाटील (धुपी), नत्थू मन्साराम (गडखांब), जंगलू कुंभार, नाना वाडिले, श्रीराम गांगुर्डे, वाल्हे दादा, मराठे दादा, प्रवीनभाऊ पेंटर, दिलीप मिस्त्री, बिरजू, मुकेश, सदाशिव भाऊ, सिंधी बांधव आणि इतर अनेक सत्संगी बंधू-भगिनी सहभागी झाले होते.

हा कार्यक्रम अमळनेर परिसरातील आध्यात्मिक एकतेचा व धार्मिक सौहार्दाचा उत्तम नमुना ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed