अमळनेर नगरपरिषद मुख्याधिकारी बदल — गणेश शिंदे यांची नियुक्ती, तुषार नेरकर कार्यमुक्त..

0
New-Doc-11-05-2025-07.12.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. विद्यमान मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना ४ नोव्हेंबरपासून कार्यमुक्त करण्यात आले असून, त्यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पुढील नेमणुकीसाठी स्वतंत्र आदेश लवकरच निर्गमित केले जाणार असल्याचे नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी आदेशात नमूद केले आहे.

राज्य सरकारतर्फे नुकत्याच झालेल्या फेरबदलांमध्ये राज्यातील एकूण ६५ मुख्याधिकारी व उपायुक्तांच्या तात्पुरत्या पदोन्नतीद्वारे बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुख्याधिकारी आणि प्रशासक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असताना तुषार नेरकर यांनी आपल्या अल्प कार्यकाळात अमळनेर शहरात अनेक विकासकामांना गती दिली. अमळनेर नगरपरिषद सध्या ‘ब’ वर्गात असली तरी वाढत्या लोकसंख्येमुळे ती वरिष्ठ नगरपालिकांच्या श्रेणीत मोडते. त्यामुळे पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना अशा महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed