माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन बनले मंत्री..

0
New-Doc-11-01-2025-07.13.jpg

24 प्राईम न्यूज 1 Nov 2025
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांचा शुक्रवारी तेलंगणाच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अझरुद्दीन यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली.

अझरुद्दीन यांच्या नियुक्तीनंतर तेलंगण सरकारमधील मंत्र्यांची संख्या आता १६ झाली आहे. ते सध्या तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर निवडून आले होते.

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी झाला नव्हता, तसेच अझरुद्दीन यांनाही पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी अझरुद्दीन यांची विधान परिषद सदस्य म्हणून आणि आता मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed