अखेर शेतकऱ्यांची स्वप्ने साकार — आमदार अनिल दादांच्या प्रयत्नातून जुन्या पिंपळे रस्त्याच्या कामाला सुरुवात..

0
New-Doc-10-27-2025-07.12.jpg


आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – अखेर या तालुक्याचे भूमिपुत्र सन्मानीय आमदार अनिल दादा पाटील यांच्या कार्यकाळात पिंपळे परिसरातील प्रलंबित विकासकामांची स्वप्ने साकार होताना दिसत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक वर्षांपासून रखडलेले जुना पिंपळे रस्त्याचे काम आता प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अनेक आमदार आले आणि गेले, पण या रस्त्याचे काम मार्गी लागले नव्हते. सोनगीरपर्यंत जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून विशेषतः मंगरूळ, पिंपळे आणि ढेकू परिसरातील शेतकरी बांधवांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी लागणारी कसरत आता कमी होणार आहे. आमदार अनिल दादा पाटील यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीमुळे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या भूमिकेमुळे हा प्रलंबित प्रश्न सुटला आहे.

रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी आमदार अनिल दादा यांचे जाहीर आभार मानत “खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आमदार” म्हणून त्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed