ग्रामस्थांची धाडसी कारवाई : मुडी-बोदर्डे परिसरातून दोन वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले..

0
New-Doc-10-26-2025-20.55.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : तालुक्यातील मांडळ, मुडी, बाम्हणे आणि कळंबू परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची चर्चा होती. या बेकायदेशीर वाळू तस्करीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. शेवटी आज ग्रामस्थांनी संयुक्तपणे धाडसी पाऊल उचलत मुडी-बोदर्डे परिसरातून वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले आणि ते मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात दिवस-रात्र सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला होता. वाळू माफियांची गुंडगिरी वाढल्याने प्रशासनाचा धाक उरलेला नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मांडळ परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू बाहेर नेण्यात येत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून शेतीवरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे “वाळू तस्करी तात्काळ थांबवावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed