कै. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजनेचे अमळनेर तालुक्यातील सुभाष पाटील घोडगांवकर ठरले पहिले लाभार्थीतब्बल एक लाखाचे अर्थसहाय्य खात्यात जमा..

0
New-Doc-10-25-2025-11.36.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या कै. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेचे अमळनेर तालुक्यातील ज्येष्ठ शासनमान्य पत्रकार श्री. सुभाष पाटील घोडगांवकर हे राज्यातील पहिले लाभार्थी ठरले आहेत. कायमस्वरूपी अपंगत्वामुळे शासनाकडून त्यांना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले असून, हा निधी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे.

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी श्री. पाटील यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात आठ महिन्यांपूर्वी अर्ज दाखल केला होता. शासनाने त्यांच्या प्रकरणाची पडताळणी करून त्यांना लाभ मंजूर केला.

कै. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजना ही १ ऑगस्ट २००९ रोजी शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आली असून, शासनमान्य पत्रकारांना अपघात, कायम अपंगत्व, दुर्धर आजार किंवा आकस्मिक मृत्यूच्या प्रसंगी आर्थिक मदत देण्यात येते.

अमळनेर तालुक्यातील सुभाष पाटील घोडगांवकर हे पत्रकार पेन्शन योजनेचेही एकमेव लाभार्थी असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा पत्रकार वर्तुळातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed