प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा पाटील यांच्याकडून दिवाळी साडी व मिठाई वाटप कार्यक्रम..

0
New-Doc-10-24-2025-23.19.jpg

24 प्राईम न्यूज 24 Oct 2025


चिमनपुरी पिंपळे (ता. अमळनेर) येथील प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सासऱ्यांच्या दानशूर व्यक्तिमत्व श्री डी. आर. पाटील (सेवानिवृत्त मंडळ अधिकारी) यांच्या सौजन्याने दिवाळी साडी व मिठाई वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमांतर्गत गावातील सर्व गरीब आणि गरजू महिलांना साड्या व मिठाईचे वाटप करण्यात आले. माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पदाधिकारी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

कार्यक्रमात माजी सरपंच भाऊसाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, गोकुळ पाटील, संतोष चौधरी, जयवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साडी आणि मिठाई मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्व महिलांनी सौ. वर्षा पाटील व श्री. डी. आर. पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed