टाकरखेडा येथे मोटरसायकल आणि बैलगाडीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू

0
New-Doc-10-24-2025-23.08.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : टाकरखेडा गावाजवळ सायंकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील (वय अंदाजे २७ वर्षे, रा. टाकरखेडा) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पाटील हे मोटरसायकलवरून जात असताना टाकरखेडा पेट्रोल पंपाच्या पुढे मोटरसायकल आणि बैलगाडी यांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात ज्ञानेश्वर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात घडलेल्या या घटनेने टाकरखेडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed