झामी चौक ते रा.मा. 15 रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन. — ₹1 कोटींच्या विकासकामाला शुभारंभ..

0
New-Doc-10-18-2025-08.17.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर हद्दीतील झामी चौक ते रा.मा. 15 या महत्त्वाच्या मार्गाचे रस्ता कॉंक्रिटीकरण व मजबुतीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कामासाठी एकूण ₹1 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन — मा.मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य व आमदार, अमळनेर विधानसभा मतदारसंघ — यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा, नगरसेवक, सह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर काम हाती घेतल्याने स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता झाली असून नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमादरम्यान अनिल पाटील यांनी जनतेच्या सहभागातून अमळनेर विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे सांगितले.

हा सोहळा प्रभागातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे खास ठरला असून या रस्ता कामामुळे वाहतुकीची सुविधा सुधारेल तसेच परिसराचा विकास वेगाने होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed