अमळनेरात ‘एस. के. ज्वेलर्स’च्या द्वितीय शाखेचे भव्य उद्घाटन धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर..

0
IMG-20251015-WA0124.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील विश्वासाचे नाव ठरलेल्या ‘एस. के. ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या प्रतिष्ठानाची दुसरी शाखा आता अधिक भव्य स्वरूपात सुरु होत आहे. १९८८ पासून ग्राहकांची अखंड सेवा करत असलेल्या या प्रतिष्ठानाचा द्वितीय शाखा उद्घाटन सोहळा धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

एस के ज्वेलर्स (शाखा २)
आपणांसाठी घेऊन आले आहेत, समृध्दीची दिवाळी शुभारंभानिमित्त १५ दिवसातील दागिन्यांच्या खरेदीवर
भव्य लकी ड्रॉ
भाग्यवान विजेता कोण?

हा सोहळा स्व. बापूसो. सुर्यकांत वामनशेठ भामरे (एस. के. बापू) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला असून, या भव्य उद्घाटनाचे शुभहस्ते श्रीमती आईसो. सुनिता सुर्यकांत भामरे यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये
मंत्री मा. श्री. नामदार गिरीषभाऊ महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य),
खासदार श्रीमती स्मिताताई उदयजी वाघ,
आमदार मा. दादासो. श्री. अनिलजी भाईदास पाटील,
आमदार मा. दादासो. श्री. अमोलजी चिमणराव पाटील,
आमदार मा. दादासो. श्री. साहेबरावजी धोंडू पाटील,
आमदार मा. श्री. शिरीषजी हिरालाल चौधरी,
पी.आय. अमळनेर मा. श्री. दत्तात्रयजी निकम साहेब,
सोन्याचे व्यापारी मा. श्री. शक्तीभाई मैती (धुळे) आणि
मा. डॉ. भाऊसो. डिंगबरजी महाले, अध्यक्ष, मंगळग्रह संस्था, अमळनेर
यांचा मान्यवरांचा समावेश आहे.

या प्रसंगी सत्यनारायण महापूजा शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली असून ती पाहुण्यांच्या आगमनापर्यंत चालणार आहे.

नवीन शाखा नगर परिषद शेजारी, स्टेशन रोड, अमळनेर येथे सुरू होत असून येथे सोनं, चांदी आणि हिरे जडित दागिन्यांचा आकर्षक व भव्य संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

‘एस. के. ज्वेलर्स’चे संचालक श्री. सचिन सुर्यकांत भामरे, सौ. कोमल सचिन भामरे, कु. किंजल सचिन भामरे, तसेच संपूर्ण भामरे परिवाराने सर्व नागरिकांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले आहे. स्थळ: एस. के. ज्वेलर्स, शाखा क्र. २, नगर परिषद शेजारी, स्टेशन रोड, अमळनेर
दिनांक: शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५
वेळ: सकाळी १० वाजल्यापासून ते आपल्या आगमनापर्यंत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed