अमळनेर तालुका ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ ऑनलाइन सदस्यता नोंदणी अभियानात अग्रेसर — प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख यांचे सुतोवाच..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – अमळनेर तर्फे कार्यकर्त्यांच्या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष व प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ऑनलाइन सदस्यता नोंदणी अभियानात अमळनेर तालुका याही वर्षी अग्रेसर राहिला आहे. प्रांतस्तरावर जवळपास चार हजार सदस्यांनी नोंदणी केली असून, हे अमळनेरकरांसाठी अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सुतोवाच केले.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. गंगा अग्रवाल यांच्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर सौ. मनीषा भांडारकर यांनी गणपती वंदना सादर केली. अॅड. भारती अग्रवाल यांनी संघटन मंत्र म्हटला. स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ बिंदू नाना जोशी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमापूर्वी पाचोरा येथील सक्रिय कार्यकर्त्या स्वर्गीय सौ. अरुणा उंटावंत आणि स्वर्गीय रोशन मोहिते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी डॉ. अनिल देशमुख यांची मध्य महाराष्ट्र प्रांत सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मकसूद बोहरी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा कार्यकारिणी सदस्य अॅड. सुभाष तायडे, सौ. निर्मला देशमुख, अॅड. देवेंद्र जाधव, अॅड. शिरीन अमरेलीवाला, सुधाकर पाटील, निलेश बडगुजर, तसेच मंगल ग्रह मंदिरचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी आणि बहिरम सर उपस्थित होते.
परिचय मेळाव्यात पाच नूतन सदस्यांचा — ज्येष्ठ पत्रकार व कवी सुभाष पाटील घोडगावकर, भाऊसाहेब देशमुख, पंकज चव्हाण, सौ. मनीषा भांडारकर आणि सौ. गंगा अग्रवाल — यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्तावित कार्यकारिणीबाबतही चर्चा झाली. तसेच डॉ. वेदांती सतीश देशमुख हिला स्त्रीरोग तज्ञ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मेरिटने प्रवेश मिळाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल देशमुख यांनी अमळनेर ग्राहक पंचायतीच्या कार्याचे कौतुक करत महाराष्ट्रात प्रथमच महिलांची स्वतंत्र कार्यकारिणी यशस्वीपणे राबविल्याबद्दल अभिनंदन केले. ऑनलाइन गेम्स बंद करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक तरुणांचे प्राण आणि आर्थिक नुकसान वाचविण्यात पंचायत यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सौ. स्मिता चंद्रात्रे, सतीश देशमुख सर, विजय शुक्ल, सुनील वाघ, जयंतीलाल वानखेडे, योगेश पाने, सौ. वनश्री अमृतकर, सौ. ज्योती भावसार, अंजू ढवळे, सौ. मेहराज बोहरी आणि कमलेश वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. कपिला मुठे यांनी केले. सांगता शांती मंत्राने अॅड. सौ. भारती अग्रवाल यांनी केली.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 128000
22 Ct सोने 91.60% : ₹. 117200
18 Ct सोने 75.00% : ₹. 97300
शुद्ध चांदी 999%:₹. 1780/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
