मदरसा फैज़ाने मोहतिशममध्ये भव्य जलसा — विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने रंगला सोहळा.

0
New-Doc-10-14-2025-06.49.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :मदरसा फैज़ाने मोहतिशममध्ये अल्हाज अब्दुल राशिद बाबा यांच्या सरपरस्तीत एक भव्य आणि उत्साहवर्धक जलसा मोठ्या थाटामाटात पार पडला. या जलसात अंदाजे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत धार्मिक व सांस्कृतिक कौशल्य सादर करत वातावरण मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाची सुरुवात तिलावत-ए-कुरआन पाकने झाली. त्यानंतर मुलांनी हदीस वाचन, प्रश्नोत्तर स्पर्धा, नात-ए-पाक आणि विविध सूरह पठण सादर केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने मंचावर सादरीकरण करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

या जलसात सिद्दिक रियाजोद्दीन शेख ,रिदा फातिमा, सय्यद कौसर ,अली आणि शाफिया फातिमा सय्यद कौसर अली यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या आई-वडिलांचे नाव उजळवले. दोघींनीही चांगले गुण मिळवून उपस्थितांची प्रशंसा मिळवली.

कार्यक्रमाची निगरानी हजरत अल्लामा मौलाना मोहम्मद आज़म रजा आफाकी नक्शबंदी (खतीब व इमाम, दरगाह अली मस्जिद) यांनी केली. जलसाचे आयोजन दरगाह अली मस्जिद ट्रस्टतर्फे करण्यात आले.

प्रमुख उपस्थितांमध्ये जनाब मुख्तार खाटीक, इमरान दादा खाटीक, अज़हर सैयद, आबिद अली सैयद, जहुर मुतवल्ली, इकबाल हाजी साहेब, फारूक अली, रुखनुद्दीन मुजावर, रियाज मौलाना कालूखां पठाण, सर गयास अहलेकर आणि ट्रस्टचे सर्व जबाबदार यांचा समावेश होता. तसेच सुन्नी दावत-ए-इस्लामीचे निगराँ फैयाज़ रज़वी साहेब आणि बाहेरून आलेले जज हजरत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना इनाम देत त्यांचे मनोबल वाढवले.

कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय अंबर जमाल, सैय्यद मुस्तफा पठाण, परवेज अली मोईज सैय्यद, जाकिर सर, जावेद खान, रऊफ शेख, वसीम मलिक, फरीद शेख, शाहिद अली, दानिश वायरमॅन, शोहेब अली वायरमॅन, तौसीफ अली तौकीर प्लंबर आणि जमाली ग्रुप अमळनेर यांनी केले.

या कार्यक्रमात सर्व मुलांचा उत्साह, पालकांचा सहभाग आणि आयोजकांचा उत्तम समन्वय यामुळे जलसा संस्मरणीय ठरला. सर्व विद्यार्थी व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 128000

22 Ct सोने 91.60% : ₹. 117200

18 Ct सोने 75.00% : ₹. 97300

शुद्ध चांदी 999%:₹. 1780/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed