मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलला “एकलव्य पुरस्कार” — विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा कामगिरीचा गौरव..

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर:श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुणे येथे आयोजित भव्य कार्यक्रमात प्रतिष्ठित “एकलव्य पुरस्कार” प्राप्त केला. हा सोहळा ब्रेन वर्ल्ड ग्रुपतर्फे “ध्वनी कार्निव्हल 2025” या कार्यक्रमात पार पडला.
या पुरस्काराद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतील उत्कृष्टता, क्रीडा क्षेत्रातील निपुणता आणि सर्वांगीण विकासाचा गौरव करण्यात आला. हा सन्मान विद्यार्थ्यांच्या कष्ट, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानला जात आहे.
शाळेचा अभिमान:
मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल ही संस्था केवळ शैक्षणिक गुणवत्तेलाच प्राधान्य देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा संस्कार आणि नेतृत्वगुणांच्या जोपासनेवरही भर देते. या पुरस्कारामुळे संस्थेची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील बांधिलकी अधिक दृढ झाली आहे.
शाळा परिवार, शिक्षकवृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला.

