निमा तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर — आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा संकल्प..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांच्या रजिस्टर्ड संघटनेची नॅशनल इंटीग्रॅटेड मेडिकल असोसिएशन (निमा) तालुका नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. सर्वानुमते अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची निवड करून संघटनेच्या नव्या कार्यकाळाला प्रारंभ करण्यात आला.
निमा नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष : डॉ. हेमंत कदम
उपाध्यक्ष : डॉ. सचिन पाटील (काटे)
सचिव : डॉ. उमेश सोनवणे
सहसचिव : डॉ. अक्षय न्हाळेदे
कोषाध्यक्ष : डॉ. हितेश मोरे
प्रचारक तथा समन्वयक : डॉ. पंकज चौधरी
महिला समन्वयक : डॉ. पुजा पंजवाणी (वाघुले)
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे, नवीन वैद्यकीय धोरणांवर चर्चासत्रे घेणे, तसेच डॉक्टरांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे यासह वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

